महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन संगमनेर:- संगमनेर तालुक्यातील निमोणचे येथील लोक नियुक्त सरपंच संदीप देशमुख यांच्या बंगल्यावर रविवारी मध्यरात्री तीन ते चार चोरट्यांनी जबरी घरफोडी केल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
देशमुख यांच्या घरातील टॉवर लाईनसाठी वापरण्यात येत असलेला १४ लाख १७ हजार ४१६ रुपये किमतीचे एक २५ स्क्वेअर्स एम एम आरमार्ड केबलचा काळ्यारंगाचा बंडल चोरून नेला असल्याची घटना रविवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत तालुका पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की,संगमनेर तालुक्यातील निमोण गावचे लोकनियुक्त सरपंच संदीप भास्कराव देशमुख यांच्या मालकीचा पिंपळे रस्त्यावर बंगला आहे. रविवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास एका स्कॉर्पिओ वाहनातून ३ चोरटे सरपंच देशमुख यांच्या बंगल्यावरती आले आणि बंगल्यातील सव्वा चौदा लाख रुपये किमतीचे केबलचे बंडल चोरुन नेले गेले आहे.
या घटनेची माहिती गावातील पुष्पगंध सेवाभावी संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांना समजताच त्या तरुण कार्यकर्त्यांनी सरपंच देशमुख यांच्या बंगल्यात चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३ जणांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन जण पळून जाण्यामध्ये यशस्वी झाले तर बालमटाकळी येथील अक्षय संजय जाधव यास तरुण कार्यकर्त्यांनी पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी संदीप भास्कर देशमुख यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वरील तिघांवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजयखंडी झोड हे करीत आहे.
निमोण गावचे सरपंच संदीप देशमुख यांच्या बंगल्यावर मागील वेळेस सुद्धा चोरट्यांनी बंगला फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. त्यानंतर ही पुन्हा अशाच प्रकारची चोरी झाली आहे आणि त्यात दोन जण फरार झाले आहेत. त्यामुळे त्यामुळे त्या चोरांपासून देशमुखांच्या कुटुंबीयांच्या जीवतास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर बाकी २ चोरट्यांना व त्यांच्या इतर साथीदारांचा शोध घ्यावा तसेच निमोण परिसरामध्ये पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी लोकनियुक्त सरपंच संदीप देशमुख मारुती घुगे यांनी केली आहे.

