Saturday, June 21, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

इगतपुरी:- तालुक्यातील जिंदाल पॉलीफिल्म प्रा. लि. कंपनीत अग्नी तांडव, कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केली पाहणी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 2, 2023
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
इगतपुरी:- तालुक्यातील जिंदाल पॉलीफिल्म प्रा. लि. कंपनीत अग्नी तांडव, कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केली पाहणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन इगतपुरी:- तालुक्यातील जिंदाल पॉलीफिल्म प्रा. लि. कंपनीत झालेली जळीत घटना अत्यंत दुर्दैवी असून राज्य शासनाच्या वतीने आग विझवण्या साठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. आग पूर्णपणे विझल्या नंतर मृत्यूचा आकडा वाढू शकतो अशी भिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी व्यक्त केली. मंत्री खाडे यांनी सोमवार दि. २ रोजी दुपारी प्रत्यक्ष जिंदाल कंपनीत येऊन आग लागलेल्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता.

आग लागून २४ तास उलटून गेल्यानंतरही तिथे उठत असलेले धुराचे लोटाच्या ठिकाणी आणखी किती कामगार अडकलेले आहेत आणि किती मृत्यूमुखी पडले आहेत. याबाबतची अधिकृत माहिती आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतरच मिळू शकेल असेही खाडे यांनी यावेळी सांगितले आहे.

फोम आणि केमिकल पावडर यांच्या मिश्रणाने आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. कंपनी परिसरात मोठ्या प्रमाणात केमिकल असल्यामुळे या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फोमचा वापर करण्यात येत असून आज सायंकाळपर्यंत आगीवर पूर्णता: नियंत्रण मिळविण्यात अग्निशामन दल, एनडीआरएफ, सीआरपीएफच्या यंत्रणांना यश येईल असेही कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सांगितले आहे. दुर्घटने दरम्यान कंपनीत नेमके कीती कामगार कामावर होते व किती कामगारांना बाहेर काढण्यात यश आले तसेच किती कामगार आतमध्ये अडकलेले आहेत, याबाबत कंपनीच्या रजिस्टरची चौकशी करून माहिती घेण्यात येणार असल्याचे कामगारमंत्र्यांनी सांगितलेआहे.
इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव औद्योगिक वसाहतीतील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत नववर्षाच्या दिवशी रविवार दि. १ सकाळी साडे अकरा वाजे दरम्यान मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला तर १७ कामगार जखमी झाले. २४ तास उलटूनही या प्लान्टमधून आगीचे लोट आणि धूर बाहेर येतच आहे. आग लागलेल्या या प्लान्टमध्ये काही केमिकलचा साठा आहे. जो पर्यंत हे सर्व केमिकल पूर्णपणे जळून जात नाही तो पर्यंत आग पूर्णता: नियंत्रणात येणार नाही अशी माहिती प्रत्यक्ष दर्शिंनी यावेळी कामगारमंत्री खाडे यांना दिली. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस करीत भेट घेतली. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत त्यांनी जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च शासन करणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

प्रशासन माहिती लपवत असल्याचा आरोप होत आहे.
कंपनीत आगीने रौद्ररूप धारण केल्याने नाशिक जिल्हयासह इगतपुरी तालुक्याच्या विविध भागातून दूरवरुनही आगीचे लोळ दिसून येत होते. या घटनेत मोठी जीवितहानी झाली आहे. मात्र कंपनी प्रशासन माहिती लपवत आहे असा आरोप माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी केला आहे. या कंपनीत जवळपास सात हजार परप्रांतीय कामगार काम करत असून स्थानिक कामगारांना कामावर घ्यावे यासाठी अनेक आंदोलने झाली. मात्र कंपनी प्रशासन नेहमी दुर्लक्ष करीत आहे. जळीत दुर्घटनेची उच्चस्तरामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी काशिनाथ मेंगाळ यांनी केली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या प्रकाराने जिल्हाभर हळहळ व्यक्त होत आहे. कंपनीच्या परिसरात कामगार व नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती. कंपनीच्या परिसरामध्ये धुराचे लोट पसरल्‍याचे चित्र दुरवरून आजही दिसत आहे.

Previous Post

संगमनेर मध्ये गुन्हेगारीचे वाढता आलेख, पोलिस मिळवणार काय गुन्हेगारीवर नियंत्रण?

Next Post

कळमना येथे कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन, क्रीडास्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना व्यासपीठ मिळण्याची संधी: मा. आमदार अँड संजय धोटे

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
कळमना येथे कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन,  क्रीडास्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना व्यासपीठ मिळण्याची संधी: मा. आमदार अँड संजय धोटे

कळमना येथे कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन, क्रीडास्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना व्यासपीठ मिळण्याची संधी: मा. आमदार अँड संजय धोटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In