रूपसेन उमराणी, मुंबई ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेमधे वुशू या खेळाचा समावेश करण्यात आला आहे,या स्पर्धा दि 9 जानेवारी ते 12 जानेवारी 2023 रोजी बालेवाडी क्रीडा संकुल म्हाळुंगे पुणे या ठिकाणी होणार आहेत. या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्हा वुशू मार्शल आर्टस् चे मुख्य प्रशिक्षक श्री. फुलचंद जावळे यांची निवड करण्यात आली आहे.
श्री. फुलचंद जावळे हे गेली 15 वर्षे ते वुशू या खेळाचे प्रशिक्षक म्हणून काम पहात आहेत. त्यांनी अनेक दर्जेदार खेळाडू तयार केले आहेत. त्यांनी अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षक व नॅशनल गेम्स इ.स्पर्धेसाठी व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. त्यांच्या याच कामाचा अनुभव पहाता ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशनचे महाराष्ट्र सचिव श्री. एस एस कटके यांनी वुशू या खेळाच्या मिनी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जावळे यांची निवड केली आहे. तरी सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे.


माझा आनंद गगनात मावेना मी ईवडा खुश आहे माझा बालपणी चा मित्र माझा लंगुटीयार mr. फुलचंद जावळे माझा त्याना 🙏नमस्कार तुम जुयो हजारो साल ये मेरी तम्माना है खुश रहो खुशुयोमे झुमो मगर ईस खुशी मे बाबा भालेराव को मत भुलो