दशरथ गायकवाड, पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे ३ जानेवारी २०२३:- रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म. फुले ट्रस्टचे, ज्ञानप्रभात विद्यामंदिर व विद्यालय, सह्योगनगर रुपीनगर, पिंपरी चिंचवड शहर, पुणे येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंती निमित्त विद्यार्थीनी भाषणे, गाणी, कविता तसेच सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित बालिका दिवस हे नाटिका सादर करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विठ्ठलराव गवळी, संस्थेचे सचिव नीलकंठ लांडगे, डॉ. वर्षां सदाफुले (सामाजिक कार्यकर्त्या), ज्ञान प्रभात विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल गवळी व ज्ञान प्रभात विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. प्रज्ञा सोनवणे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

सर्व प्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थी भाषणे झाली. विद्यार्थ्यानी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास सांगितला. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यानी ‘बालिका दिवस’ ही नाटिका अतिशय छान रीतीने सादर केली. याप्रसंगी बालिका दिवसानिमित्त निमित्त डॉ. वर्षा सदाफुले मॅडम व विठ्ठलराव गवळी यांनी उपस्थीत सर्व विद्यार्थ्याना अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन केले . श्रीम. शुभांगी सुतार यांनी सर्वांचे आभार मानले व सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348