सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन
बल्लारपुर:- भिमा- कोरेगाव शौर्यदिना निमीत्त्य बल्लारपुर तालुका व शहर समता सैनिक दलाच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावर्षी 205 भिमा कोरेगाव शोर्य दीन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समता सैनिक दलाचे महाराष्ट्र राज्य बौध्दिक प्रमुख मार्शल डॉ. भास्कर कांबळे, बल्लारपुर तालुका बौध्दिक मार्शल कृष्णमूर्ती रामटेके यांच्या हस्ते दिपप्रज्वलीत करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करुन माल्यार्पण करण्यात आले.तद्पच्छात जिल्हा ट्रेनिंग आफिसर मार्शल अमर आक्केवार यांनी सेल्यूटेशन देऊन उपस्थित मार्शल्स ना शपथ दिली. बुध्द वंदना नंतर अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी चंद्रपुर जिल्हा महिला विंग संघटिका मार्शल उज्वला खोब्रागडे, चंद्रपूर जिल्हा सहसंघटक मार्शल आनंद दुबे, बल्लारपुर तालुका संघटक मार्शल धनराज पुणेकर, तालुका प्रचारक मार्शल मोहन देठे,, मार्शल नितीन लभाने, चंद्रपूर शहर महिला विंग संघटिका मार्शल आशा थुल, बल्लारपुर शहर महिला विंग संघटिका मार्शल श्रद्धा अलोने, मार्शल रेखा रामटेके, मार्शल द्राक्षा दुर्गे, मार्शल नालंदा भगत, मार्शल मोना खोब्रागडे, मार्शल स्वयम अलोणे, मार्शल पियुष कासोटे व अनेक मार्शल्स यावेळी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

