देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणा:- देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे नुकतेच वृध्दापकाळात निधन झाले. त्यामुळे त्यांना देशभरातून विविध नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरीच्या व्यापारी संघटनेने हिराबेन मोदी यांच्या श्रध्दांजलीचा कार्यक्रम वानाडोंगरीच्या बसस्थानकावर आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध समाज घटकातील नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी वानाडोंगरी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुधीर वानखडे, संघटन सचिव समाधान माने, मोहन मोते, राजु पटले, गेंदलाल तेलंग, अमोल गवई, स्वप्नील बारई, मनिष डोंगरे,यश वानखडे, रचित तेलंग, महादेव वाघमारे, सुरेश मोते, सौरभ शाह, यादवराव बावनकर, विदानम शुक्ला, अज्जू शिरपुरे, सोनु मेश्राम, काशिराम चौरेवार, अशोक मोहलिया, तसेच राजीवनगर गल्ली क्रिकेट क्लब चे प्रितम यादव, हिमांशू गौतम, करण बिसेन, अर्जून बिसेन, अतुल दमाहे, गौरव पालीवाल व मनिष खरोले इत्यादी श्रद्धांजली अर्पण करताना उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348