प्रशांत जगताप, संपादक 7385445348
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील विविध गावात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी या गावकऱ्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात सावित्री बाई फुले यांना अभिवादन केले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी पेरलेल्या विचारावर चालण्याचा यावेळी पण केला आहे.
धोत्रा (रेल्वे) येथे बुद्ध विहारात आज दि.3 जानेवारी 2023 ला मातोश्री सावित्रीबाई फुले यांच्या 192 व्या जयंती निमित्त उमेश कांबळे यांनी बुद्ध विहारास मातोश्री सावित्रीबाई फुले यांच्या फोटो सप्रेम भेट दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा प्रबोधन कार पद्माकर कांबळे यांनी अनेक जयंती गीते सादर केली. नागरिकांची माता सावित्रीला अभिवादन केले आणि जयंतीच्या शूभेच्छा दिला.

पिपरी पुनर्वसन सालोड(हिरापूर) येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन ग्राम पंचायत सदस्य श्री. नाखले, सामाजिक कार्यकर्ते राहुल ऊके यांनी केले. सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गजानन सुरकार, एडमवर मॅडम, प्रबोधनकार, सामाजिक कार्यकर्ते पद्माकर कांबळे, यांनी सावित्रीबाई जयंती गीते सादर केली व त्यानंतर छोट्या मुलींचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.

इंदिरा झोपडपट्टी वॉर्ड न .5 सालोड हिरापूर येथे मातोश्री सावित्रीबाई फुले यांच्या 192 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभागातील शेकडो महिला आणि पुरुष एकत्र येत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माता सावित्रीने केलेल्या कार्यामुळे आज आम्ही जगत आहोत त्यामुळे आजन्म आम्ही माता सावित्रीच्या ऋणी असणार आहोत.