प्रवीण जगताप, हिंगणघाट प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक ३ जानेवारी २०२३ ला क्रांतीज्योती माता सावित्री माई फुले जयंती उत्सव बौद्ध पंच कमेटी महीला व पुरुष संयुक्त मंडळ सिध्दार्थ बुद्ध विहार सिध्दार्थ नगर हिंगणघाट येथे आयोजित करण्यात आले या क्रांती ज्योती सावित्री माई जयंती उत्सव कार्यक्रमला गित गायन तसेच संबोधन करण्यात आले. त्यामधे शेकडो महिलासह बाल मित्र मैत्रीणी उपासक उपासीका यांनी भाग घेतले.

ज्या छोट्या मुलांनी आपले मत मांडले तसेच गित गायन केले त्यांना दुर्गादास मानकर यांच्या तर्फे आपल्या जन्मदिनानिमित्त पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्ध पंच कमेटी महीला व पुरुष संयुक्त मंडळ सिध्दार्थ नगर च्या सचीव भावना ढेकले यांनी केले तसेच आभार प्रदर्शन बौद्ध पंच कमेटी महीला व पुरुष संयुक्त मंडळ सिध्दार्थ नगरच्या अध्यक्षा अनु दुर्गादास मानकर यांनी केले. आज अती उत्साहाने बालीका दिवस व स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला. यावेळी संपुर्ण सिद्धार्थ नगर कडुन सर्व हिंगणघाट वासीयांना सावित्री माई जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

