पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
गुन्हे शाखा व कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर
दिनांक ०२/०१/२०२३ रोजी सकाळी ०९.१५ वा. पुर्वी मेयफेर इंलिगंझा सोसायटीच्या समोर साई मंदिरालगतच्या मोकळ्या मैदानात रिकाम्या प्लॉटमध्ये बोरीच्या झाडा खाली कोंढवा, पुणे येथे अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाची अनोळखी महिला अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून दगड व इतर कोणत्या तरी वस्तुने मारून जखमी करुन खुन करुन मयताची ओळख पटू नये म्हणून चेहरा जखमी करून विद्रुप करून मयत बाँडी झुडपात पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फेकुन दिल्याने कोंढवा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ०७/२०२३ भादंवि कलम ३०२,२०१ प्रमाणे दाखल आहे.. गुन्हयाचे घटनेबाबत माहिती मिळताच तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळी मा. सहा. पोलीस आयुक्त, सो, वानवडी विभाग, आम्ही व कोंढवा पोलीस ठाणे व गुन्हे शाखेकडील अधिकारी व अमलदार यांनी धाव घेतली. स
मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री रंजनकुमार शर्मा मा अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, गुन्हे श्री. अमोल झेंडे व मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ श्री. विक्रांत देशमुख गा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री नारायण शिरगावकर यांनी घटनास्थळाची पाहणी करून त्यांचे मार्गदर्शन व सुचना खाली सदर गुन्हयाचा संयुक्तीक तपास चालू केला.
तपास पथक कौसरबाग भागात संशयित आरोपीतांचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदार याच्या कडून मिळालेली माहिती व उपलब्ध पुरावे या वरून आरोपी निष्पन्न झाल्याने १) जैद आसिफ शेख वय २० वर्षे वर्षे राहणार:- शिवनेरीनगर, गल्ली नं. ११ कोंढवा, पुणे व २) विधीसंघर्षात बालक यांना ताब्यात घेतले आहे. वरील आरोपी यांच्या कडे केल्या चौकशी मध्ये जैद आसिफ शेख याने सांगितले की काल दि. ०१/०१/२०२३ रोजी रात्री ७/३० ते ०९ वा. सुमारास मेयफेर इंलिगंझा सोसायटीच्या समोर साई मंदिरालगतच्या मोकळ्या मैदानात झाडाचे आड बसलो होतो. त्यादरम्यान एक महिला त्याठिकाणी आली असताना व मला दारु द्या असे म्हणुन आमचेसोबत वाद घालू लागली. त्याचा राग आम्हाला आल्याने आम्ही दोघांनी तिला धक्का मारल्याने ती खाली पडली व त्याचवेळी बाजुला असलेला मोठा टोकदार दगड तिच्या तोंडावर आम्ही दोघांनी आळीपाळीने मारले. दगडाचा घाव जोरदार बसल्याने ती महिला जागीच निपचीत पडली व तिची हालचाल बंद झाली. त्यामुळे ती मयत झाली असावी असे वाटल्याने आम्ही लगेच घाबरून पळुन निघुन गेलो. वगैरे सांगितल्याने आरोपी जैद आसिफ शेख यास तपासकामी आज रोजी अटक केली आहे. मयत अनोळखी महिलेची ओळख पटविणे साठी कोंढवा पोलीस स्टेशन चे दोन पथक स्थापन केले आहे व गुन्हे शाखा क्रमांक ५ चे पथक सुद्धा त्या साठी शोध घेत आहेत. वरील महिलेबाबत काही माहीती प्राप्त झाल्यास कोंढवा पोलीस ठाणेस संपर्क करावा.
सदरची कारवाई मा पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे मा. अपर पोलीस आयुक्त पूर्व विभाग श्री रंजन शर्मा मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. अमोल झेंडे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ श्री. विक्रांत देशमुख मा.सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्रीमती पोर्णिमा तावरे मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे- २ श्री. नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर श्री. उल्हास कदम, प्रभारी पोलीस निरीक्षक व गुन्हे कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. संजय मोगले, गुन्हे शाखा व पो. ठाणे कडील पोलीस अंमलदार यांनी कामगिरी केली आहे.