पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज – ऑनलाइन पुणे:– प्रवास दरम्यान सोन्याचे दागिने रिक्षामध्ये विसरल्याची एक घटना पुणे येथील चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून समोर आली आहे.
प्राप्त माहितनुसार, जान्हवी पवन गुंटरवार, रा. साईधाम कॉलनी डायमंड वॉटर पार्क रोड लोहगाव पुणे ही महिला दिनांक 1 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास द्वारका गार्डन चौक चंदनगर येथून पीएनजी ज्वेलर्स हडपसर येथे जात होत्या. त्या ऑटो ने करत असताना या प्रवासा दरम्यान त्यांच्या जवळ असलेली एक काळ्या रंगाची बैग व त्यामध्ये अंदाजे एक ते दीड तोळे सोन्याचे मनी रिक्षामध्ये विसरल्या होत्या.
रिक्षा मध्ये बैग विसरल्याचे जान्हवी पवन गुंटरवार यांच्या लक्षात येताच त्यांनी चंदननगर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन या विरुद्ध लेखी तक्रार दाखल केली. तक्रारकर्तीच्या तक्रारी वरून चंदननगर पोलिसांनी तपास सुरू केला आणि रिक्षा वाल्याचा शोध सुरू केला.
या घटनेचा तपास पथकातील अंमलदार नामदेव गडदरे व सुभाष आव्हाड यांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून तक्रारदार महिलेला तिचे हरवलेले दागिने परत मिळवून दिले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अंमलदार नामदेव गडदरे व सुभाष आव्हाड यांनी केली. या प्रकरणात निहित कर्तव्य केले म्हणून चंदननगर पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे.