निखिल पिदूरकर, कोरपणा तालूका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भोयगांव;- स्थानिक राजेंद्र विद्यालय भोयगांव येथे शारिरिक शिक्षक श्री. महेश अंबादास अरके यांच्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त होणाऱ्या शारिरिक शिक्षक श्री. महेश अंबादास अरके यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व भेट वस्तू देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. चटप सर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. बी. झेड. निखाडे, श्री. डी. डी. ठाकरे, श्री. जी. एम. लांडे, कु. व्ही. टी. वैद्य, श्री. डी. टी. पानघाटे, श्री. चंदन चायकाटे (लिपिक)श्री. व्ही. बी. वनकर श्री. श्रीमती सुरेखा पिपळशेंडे श्री. डी. आर. चिने उपस्थीत होते. सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सत्कार मूर्तीचा परिचय श्री. जी. एम. लांडे यांनी केले. याप्रसंगी कु. वैष्णवी लोंढे व कु. मानसी वरारकर या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.
सत्कारमूर्ती श्री. अरके सर यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्याकडून कळत नकळत कोणी दुखावले गेले असेल त्यांची माफ करावे असे सांगून सर्वांचे आभार मानले. त्यांच्या सहचारिणी सौ. अनिता महेश अरके यांना नुकतीच प्राथमिक आरोग्य केंद्र लोंढोली येथे सुपरव्हायजर पदावर पदोन्नती मिळाली आहे. अध्यक्षीय भाषणात मा. मुख्याध्यपकांनी सत्कार मुर्तीनी शाळेच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल प्रशंसा केली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. व्ही. टी. वैद्य तर आभार श्री. डी. डी. ठाकरे यांनी मानले.