मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील पोर्टलच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या पत्रकाराच्या पत्रकार संघाची कार्य कारणी घोषित करण्यात आली. त्यात अहेरी तालुका अध्यक्ष म्हणून जावेद अली, तालुका उपाध्यक्ष किशोर उसेंडी, सचिव सौ. नीलिमा श्रीनिवास बंडमवार, सहसचिव मधुकर गोंगले यांची आज आभासी पद्धतीने घेण्यात आलेल्या मीटिंग मध्ये कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून यांची सर्वांनुंमते निवड करण्यात आली.
यावेळी योगेश योगलोपवार पेरमिली सदस्य, सुरेश मोतकूलवार सदस्य, जुगलभाऊ बोमनवार सदस्य, अन्सार अली सय्यद सदस्य, एजाज पठाण सदस्य हे या मीटिंग मध्ये सहभाग होते. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली तसेच सहा जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमाबाबद यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच ग्रामीण भागात ज्या अनेक समस्या असून या कश्या पद्धतीन सोडविण्यात येणार याबद्दल सुद्धा सविस्तर चर्चा करण्यात आले आहे.
सर्व नव नियुक्त पत्रकाराची पत्रकार संघटनेच्या विविध पदावर नियुक्ती झाल्या बदल यावेळी शुभेच्या देण्यात आल्या.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348