✒️मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- सध्या महाराष्ट्र वीज वितरक महामंडळाच्या कर्मचाऱ्याचा विविध मागण्या घेऊन संप सुरू केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत यावर तोगड निघाला नाही तर महाराष्ट्र अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली होती.
त्यामुळे संपकरी वीज कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. त्यानंतर संप मागे घेत असल्याचे कर्मचाऱ्यांनी घोषित केले. कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांचा सकारात्मकपणे विचार करत असून वीज कंपन्यांच्या खासगीकरणाचा कोणताही विचार नाही उपमुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. त्यांचे मानधन थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. त्यांची सामाजिक सुरक्षितता जपण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

