मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर 9420751809
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातील वायगाव दुर्गापूर जिल्हा परिषद क्षेत्रातील दुर्गापुर, चित्तरंजनपूर, वायगाव आणि रविंद्रपुर या गावातील नागरिकांना असलेल्या विविध समस्या महिला प्रदेश सचिव काँग्रेस कमिटीचे चंदाताई नितीन कोडवते जाणून घेतल्या.
आज गावात नागरिकांना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत त्या समस्या कशा प्रकारे सोडवता येईल याबाबत संपूर्ण माहिती गावकऱ्यांकडून जाणून घेतली. यावेळी सौ चंदाताई नितीन कोडवते महिला प्रदेश सचिव काँग्रेस कमिटी, बीजन सरकार माजी सरपंच दुर्गापुर, प्रेमानंद गोंगले NSUI तालुका अध्यक्ष चामोर्शी, परिमल बहादूर माजी उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी चामोर्शी, अशोक हलदार दुर्गापुर, विपुल दुर्गापुर, डॉ. विश्वास दुर्गापुर, अजित परमाणिक दुर्गापुर, मनोरंजन हलदार चित्तरंजनपूर, रमेश मंडल चित्तरंजनपूर, सुरज मंडल उपसरपंच रविंद्रपूर, कृष्णा मंडल रविंद्रपूर, नितीश बिश्वास रविंद्रपूर सह काँग्रेस कार्यकर्ते, नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.