सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:-16 डिसेंबर 2022 ते 19 डिसेंबर 2022 या कालावधीत रोटरी कडून रोटरी विशाल मेलाचे आयोजन तालुका क्रीडा मैदान, गौरक्षण वार्ड बल्लारपुर येथे आयोजन करण्यात आले होते. या विशाल मेलाचे उदघाटन सुधीर मुनगंटीवार, मंत्री वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते झाले. आपल्या भाषणात रोटरीच्या कार्याची प्रशंसा केली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कांचन जगताप तहसीलदार बल्लारपूर, उमेश पाटील पोलीस निरीक्षक बल्लारपूर, हरीश शर्मा माजी नगराध्यक्ष बल्लारपूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रामुख्याने या विशाल मेल्याला बाळूभाऊ धानोरकर, खासदार चंद्रपूर लोकसभा क्षेत्र, घनश्याम मूलचंदाणी, माजी नगराध्यक्ष बल्लारपूर व बल्लारपुरातील इतर मान्यवरांनी भेट देऊन रोटरी बल्लारपूर च्या कामाची स्तुती केली. लोकांच्या मनोरंजनासाठी भरवलेल्या विशाल मेल्यात आंतरशालेय नृत्य स्पर्धा घेण्यात आली. यात तालुक्यातील 13 शाळेने सहभाग घेतला. चित्रकला स्पर्धेत 190 तर रांगोळी स्पर्धेत 43 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक सई राजेश चिंतावार, दिलासा ग्राम कॉन्व्हेंट बल्लारपूर तर 2 रा क्रमांक प्रगती शर्मा आयडियल कॉन्व्हेंट बल्लारपूर, रांगोळी स्पर्धेत 1 ला क्रमांक सार्थक लोहकरे, आयडियल कॉन्व्हेंट 2 रा क्रमांक सक्षम केशकर, वैभव कॉन्व्हेंट तर समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक आयडियल कॉन्व्हेंट बल्लारपूर तर 2 रा क्रमांक वियानी कॉन्व्हेंट बल्लारपूर यांनी मिळविला. मोठया प्रमाणात उपस्थिती दर्शवून लोकांनी विशाल मेला येथील तंबोला खेळाचा आस्वाद घेतला. यावेळी विविध प्रकारची दुकाने, झुले, खाण्याच्या वस्तूने विशाल मेला गजबजलेला होता. सर्व स्तरातून रोटरीच्या विशाल मेलाची प्रशंसा होत आहे. रोटरी बल्लारपूर या उपक्रमाप्रमाणेच वर्षभर इतरही सामाजिक, शैक्षणिकव आरोग्याशी निगडित कार्यक्रम घेत असतात.
या विशाल मेला ला उत्कृष्ट करण्याकरिता रोटरी बल्लारपूरचे अध्यक्ष प्रफुल चरपे, महेश कायरकर, राहुल वरू, रोट्रॅक्टचे अध्यक्ष चैतन्य पटेल, राम तम्पालु, अमोल गांधी, राजू मुंधडा, कल्पेश पटेल, मनीष मूलचंदाणी, प्रशांत दोंतुलवार, निलेश चिमड्यालवार, अनुप गंगशेट्टीवार, उमेश पटेल, उत्तम पटेल, अजय वासलवार विक्रांत पंडित, अखिल निखारे, सचिन तल्हार, निखिल गुजरकर, रवी साळवे, प्रशिक वाघमारे, सुरेश कुक्रेजा, पवन पवार तर रोट्रॅक्टचे, अनुज अग्रवाल, जयेश पटेल, रजत परमार, गौरव पटेल, हेमराज गेडाम, मोहित पटेल व दीपेश पटेल यांचे सहकार्य मिळाले.