वंचित बहुजन आघाडी आक्रमक होताच, वैद्यकीय अधिकारी यांनी मागितली माफी.
रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतुर:- येथून खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले यावेळी. ज्यांनी भारतीय घटनेच्या माध्यमातून आपल्याला मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ध्वजारोहणा दरम्यान नसल्याचे आढळून आले. ग्रामीण रुग्णालय प्रशासनावर नागरिकांनी प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे.
या वेळी परीसरातील संताप व्यक्त करत म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले हक्क चालतात. पण हक्क देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चालत नाही? त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र भदर्गे तसेच परतूर शहर अध्यक्ष राहुल नाटकर वंचित बहुजन आघाडीचे मंठा येथील तालुका उपाध्यक्ष सुधाकर खरात, सुनील कामिटे, संदिप कामिटे, तसेच परतूर येथील आवी पाडेवार, राहुल पाईकराव, फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते. उपस्थित होते.
यावेळी वैद्यकीय अधिकारी दुर्गावाड यांना त्यांची चुकी दाखवून दिली व वैद्यकीय अधिकारी दूर्गावाड यांनी इथून पुढे असला प्रकार होणार नाही. असे सांगितले तसेच आपल्या समाज बांधवांच्या भावना दुखावल्या याबद्दल वैद्यकीय अधिकारी दुर्गावाड त्यांनी माफी मागितली. वंचित बहुजन आघाडी परतूर तालुक्याच्या वतीने ग्रामीण रुग्णालय परतूर यांना परतूर तालुका अध्यक्ष रविंद्र भदर्गे व शहर अध्यक्ष राहुल नाटकर व सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांच्या उपस्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिली.