अनिल कडू विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मातोश्री आशाताई कुणावर कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय येथे पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर तर अतिथी म्हणून पांडुरंगजी तुळसकर संस्थापक अध्यक्ष विद्या विकास शिक्षण हिंगणघाट, डॉ. नयना शिरभाते उपप्राचार्य विद्या विकास महाविद्यालय समुद्रपूर, डॉ. सपना जैस्वाल उपप्राचार्य मातोश्री महिला महाविद्यालय आदींची होती.
यावेळी अध्यक्षीय मनोगतातून डॉ. उमेश तुळसकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक पालक संबंध महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले, त्याचबरोबर महाविद्यालयाच्या आगामी योजने विषयी चर्चाही पालकांशी केली. पालकांचाही या सभेला भरघोस प्रतिसाद होता. पालक प्रतिनिधी म्हणून नरेंद्र शेंडे यांनी आपले मत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या शैक्षणिक क्षेत्राविषयी यशस्वी वाटचालीसाठी सर्वांचे अभिनंदन केले. पालकांनी सभेमध्ये महाविद्यालय विषयीचे आपले मत व्यक्त केले.
या सभेचे प्रास्ताविक प्रा. वैशाली तडस तर संचालन प्रा. अनुश्री भोयर आणि आभार प्रा. दुबे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.