पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन.
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा ,दि.6:- आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 च्या निमित्ताने सहकारातून समृध्दी निर्माण करणे व सहकाराला बळकटी देण्यासाठी दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित मुबंई व वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वर्धाच्या संयुक्त विद्यमाने रविवार 9 फेब्रुवारी रोजी सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सहकार मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे गृह (ग्रामीण), गृह, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते होणार आहे. आहे.
दि. 9 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता दत्ता मेघे सभागृह सावंगी मेघे येथे दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मर्यादित मुबंईचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या मेळाव्यास खासदार अमर काळे, आमदार ॲङ अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, आमदार समीर कुणावार, आमदार सुमित वानखेडे, आमदार राजेश बकाने, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था दिपक तावरे, जिल्हाधिकारी तथा वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सनियंत्रण समिती समन्वयक वान्मथी सी., दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे कुलगुरु डॉ. ललीत वाघमारे, अप्पर निबंधक तथा सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील, विभागीय सहनिबंधक प्रविण वानखेडे, व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सिमा पांडे, प्रशासक राजेंद्र कौसडीकर व सहव्यवस्थापक बबीता तायडे यांनी केले आहे.

