संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती दि. 9 जानेवारी:- सकल मातंग समाजाच्या वतीने गोंडवाना महा. जिवती येथे सामाजिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या नोटीस मध्ये दिलेल्या विषयानुसार सविस्तर चर्चा करून त्याबाबत ठराव घेण्यात आले. जिवती येथे आरक्षण उपवर्गीकरण संदर्भाने लवकरच मोर्चाचे आयोजन करण्याचे बहुमताने ठरले.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भगवान डुकरे होते, या बैठकीच्या सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये डॉ. अंकुश गोतावळे यांनी आरक्षण उपवर्गीकरण, आर्टी आणि इतर विषयावर सविस्तर माहिती दिली. त्यानंतर बैठकीस उपस्थित प्रत्येक समाज बांधवाने आपले मत मांडले. शेवटी गोविंद दुबले यांनी आपले मत मांडून सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले.
या बैठकीस पंढरी गायकवाड, मारोती मोरे, दत्ता तोगरे, प्रा. सुग्रीव गोतावळे, दत्ता गायकवाड, वैजेनाथ शिंदे, डॉ. पांडुरंग भालेराव, देविदास कांबळे, नागोजी केंद्रे, केशव भालेराव, गणेश वाघमारे, विजयकुमार कांबळे, तिरुपती भाऊ, रामा कुंटेवाड, बा रा. वाघमारे, हरिदास टोम्पे, नवनाथ जांभळे, मारोती कांबळे, माऊली पवार, आनंद पवार, जयराम मोरे, लहुकांत काकडे, सिमॉन घोडके, अंबादास कंचकटले, अनिल घोडक, डॉ. चरण केदासे, संजय मोतेवाड, अनिल कांबळे, प्रा. योगेश पट्टेवाले, लहू गोतावळे, विजय गोतावळे, सुनील वाघमारे, अंबादास गोतावळे, रमाकांत कांबळे, रणजित सूर्यवंशी, नितेश ढगे, धर्मा गोतावळे, दत्ता भालेराव इत्यादी समाजबांधव उपस्थित होते.

