मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- हिंगणघाट येथील पत्रकार सोनू उर्फ प्रदीप आर्य यांचा वर्धा येथील महात्मा लाॅन येथे वाईस ऑफ मिडिया यांच्याकडून आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट पत्रकार म्हणून गौरव करण्यात आला. गेल्या 15 वर्षा पासुन सत्तत पत्रकारीता श्रेत्रात उकृष्ट कामगिरी बजावत असता हा सन्मान देण्यात आला.
व्हॉइस ऑफ मीडिया वर्धा जिल्हा त्यांच्याकडून पत्रकार कार्यशाळा व स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, भारतातील प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, ज्येष्ठ विचारवंत व्यंकटेश जोशी ‘बाळासाहेब पानसरे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वृक्ष मित्र आणि इतर मान्यवर यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी उपस्थित कार्यक्रमात जिल्ह्यातील उत्कृष्ट पत्रकाराचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी हिंगणघाट येथील पत्रकार सोनू उर्फ प्रदीप आर्या यांच्या कार्याची दखल घेत वाईस ऑफ मीडिया वर्धा जिल्हा कडून गौरव करण्यात आला. हा गौरव जेष्ठ आणि भारताचे प्रसिद्ध पत्रकार अशोक वानखेडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि स्मृती चिन्ह देऊन करण्यात आला या मिळालेल्या सन्मानाबद्दल हिंगणघाट येथील पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

