सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- देशात आणि राज्यात सायबर चोरांनी थैमान घातले आहे. सायबर अरेस्टच्या नावावर शेकडो लोकांची फसवणूक केली आहे. त्यात आता एक बँकेवर सायबर दरोडा टाकल्याच्या घटनेने खलबल माजली आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन दरोडा टाकल्याच्या माहिती समोर आली आहे. यात बँकेतील तब्बल 3 कोटी 70 लाख रुपये या सायबर गुन्हेगारांनी लुटले असल्याचे समोर आले आहे. आता नागरिक पाठोपाठ बँकपण या सायबर चोरांनी सोडल्या नसल्याची चर्चा चंद्रपूर जिल्हात सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, 7 ते 10 फेब्रुवारी सुमारास झालेले अनेक व्यवहारांमध्ये सायबर गुन्हेगारांनी दिल्ली आणि नोएडा येथील खात्यांवर रक्कम वळती केल्याचे सांगितलं जातंय. दिल्ली, नोएडा येथील खात्यांवर रक्कम परस्पर वळती चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून (RTGS) आरटीजीएस केलेली रक्कम नागपूर येथील येस बँकच्या माध्यमातून होते लाभार्थी (Beneficiary) च्या खात्यात जमा होते. अशातच 7 ते 10 फेब्रुवारी या दोन दिवसात 34 खातेदारांच्या खात्यामधून ही रक्कम RTGS आरटीजीएस करण्यात आल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणात जिल्हा मध्यवर्ती बँक ‘मेकर आणि चेकर’ आहेत. तर बेनिफिशरी बँक येस बँक असल्याचे सांगितलं जातंय. मात्र आरटीजीएस (RTGS) केलेली रक्कम संबंधित खात्यांमध्ये जमा न झाल्याने संशय आला.
बँकेत सायबर दरोडा पडल्याची माहिती चंद्रपूर बँक प्रशासनाला कळताच बँक प्रशासनाने चंद्रपूर येथील रामनगर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चंद्रपूर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केलाय. मात्र या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर यातील गुन्हेगारांना अटक करण्याचे मोठे आव्हान आता पोलीसान समोर असणार आहे.

