आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- शहरात एक संपूर्ण खळबळ माजवून घेणारी घटना समोर आली आहे. येथील स्वारगेट एसटी स्टँड परिसरात एका पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गुन्ह्यातील आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही.
पुण्यात स्वारगेट बस स्थानकात पहाटेच्या सुमारास बसमध्ये मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते स्वारगेट बसस्थानक राज्यातील प्रमुख बस स्थानकांपैकी एक असून समोरच पोलीस स्थानकही आहे. तरी एका सराईत गुन्हेगाराकडून बिनदिक्कत तरुणीचे अत्याचार करण्यात आल्याने सार्वजनिक स्थळांवरील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिढीत तरुणी ही पुण्यात काम करत तीआपल्या गावी जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात बससाठी थांबली होती. त्यावेळी आरोपी तिथे गेला. गोड बोलून त्याने ओळख करुन घेतली. कुठे जाता म्हणून त्याने मुलीला विचारलं. मुलीने तिला फलटणला जायच असल्याच सांगितलं. त्यावर आरोपीने ती बस इथे लागत नाही असं सांगितलं. त्यावर तरुणीने बस इथेच लागते असं त्याला सांगितलं’
त्यानंतर आरोपी त्या तरुणीला म्हणाला की, बस इथे लागत नाही, मी तम्हाला दाखवतो असं म्हणाला. त्यानंतर ती तरुणी आरोपी सोबत बसच्या दिशेने गेले. तरुणी बस जवळ गेल्यानंतर त्याला म्हणाली की, बसमध्ये तर अंधार आहे. त्यावर आरोपीने तिला सांगितलं की, ही रात्रीची लेट बस आहे. सगळे लोक झोपले आहेत, हवं तर तू वर चढून टॉर्च मारुन बघं. ही तरुणी बसच्या आतमध्ये जाताच त्याने मागून दरवाजा बंद करुन घेतला आणि या तरुणीबरोबर बलात्कार केला.
अत्याचार नंतर तरुणीने मित्राला लावला फोन: तरुणीवर अत्याचार केल्यानंतर नराधम आरोपी आधी बसमधून उतरला. त्यापाठोपाठ दोन मिनिटांनी पिढीत तरुणी बस मधून उतरली. ती फलटणला जाणाऱ्या बसमध्ये बसली. तिने तिथून मित्राला फोन लावला. यावेळी तिच्या मित्राने तिला सांगितले की याबाबत पोलिसात जाऊन तक्रार दाखल कर. त्यानंतर या तरुणीने लगेच स्वारगेट पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. या घटनेची गंभीरता बघता पोलिसांनी लगेचच कारवाई सुरु केली.
नराधम आरोपी शिरुर गावचा: पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ कारवाई सुरू केली. यावेळी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून नराधम आरोपीचे फुटेज काढलं. यावेळी पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे. नराधम आरोपी हा शिरुर गावचा रहिवासी असून त्याच्यावर 392 चा गुन्हा दाखल आहे. आरोपीचा शोध सुरु आहे. कालपासून 8 टीम काम करत आहेत असं पोलिसांनी सांगितलं.

