युवराज मेश्राम, प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपूर:- कळमेश्वर येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पोलीस स्टेशन कळमेश्वर यांचे संयुक्त विद्यमाने मीटिंग घेण्यात आली या मिटींगला महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या सदस्या ॲड. मुक्ता दाभोळकर अनिसचे राज्य कार्यकारणी सदस्य रामभाऊ डोंगरे राज्य विभागीय सदस्य विजया श्रीखंडे या कार्यक्रमाला उपस्थित होते. स्वागताध्यक्ष मनोज काळबांडे ठाणेदार यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या सभेचे अध्यक्ष डॉ. उपेंद्र महात्मे हे होते तर विशेष अतिथी शाखेचे महासचिव अरुण वाहने, मीडिया प्रभारी युवराज मेश्राम, कार्याध्यक्ष गायक अरुण सहारे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष कृष्णाजी बगडे आणि शोभाताई पाटील मंचावर उपस्थित होते.
यावेळी ॲड. मुक्ता दाभोळकर म्हणाल्या की संविधानाने सर्वांना आपापल्या धर्माचा पूजाअर्चा करण्याचा अधिकार दिलेला आहे पण मानव समाजाच्या प्रगतीच्या विरुद्ध मानसिक रोगाने पछाडलेल्या समूहाचा जर बुवाबाजी जादूटोणा या विशाल शोषण होत असेल तर अनिस त्याविरुद्ध आवाज उठवेल संयम शांती करूणा व कायद्याला धरून विज्ञानाला धरून मानवाच्या दुःखमुक्तीचा हा लढा आहे असे विचार त्यांनी उपस्थित जनतेसोबत सुसंवाद साधून त्यांनी केले.
यावेळी ठाणेदार मनोज काळबांडे म्हणाले की बुवाबाजी भानामती जादूटोणा असे जर प्रकरण माझ्या कार्यक्षेत्रात घडतील तर मी नक्कीच तातडीने याविषयी आपल्या शाखेला सहकार्य करेल. या कार्यक्रमाचे रामभाऊ डोंगरे यांनी प्रास्ताविक केले व अनिश शाखेचे अध्यक्ष डॉ. उपेंद्र महात्मे यांनी आपले अध्यक्ष भाषणात सांगितले की मी माझ्या विद्यार्थ्यांना विज्ञान वादाला धरून अंधश्रद्धेचे निर्मूलन कसे होईल हेच शिकविले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायक अरुण सहारे यांनी केले तर दीपक मेश्राम कृष्णाजी बगळे हरिदासजी इंगळे महेंद्र शेंडे राजपाल बनसोड एफडी गुंडाणे प्राध्यापक हरिभाऊ शेंडे मनोहर राऊत विजय ठाकरे गौतम जांभुळकर यांनी काही प्रश्न विचारून सुसंवाद साधला.
या कार्यक्रमाला भरपूर लोकांची उपस्थिती होती त्यात मेघराज नवले, गणेश तांबुसकर, अरविंद तायडे, दयाराम धनगरे, किशोर परखड, लक्ष्मण धनगरे, शुद्ध पालघर, लक्ष्मण गायकवाड, अरुण धोटे, सूर्यभान गायकवाड, पिंटू निंबाळकर, हरिदास गजभिये, सेवानिवृत्त तहसीलदार टी आर शेख, डी एस बुलांदे, मनीष शेंडे, चंद्रशेखर उके, सविता नानवडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. गाय करून नवसारी यांचं अंधश्रद्धा मधील प्रबोधन गीत सादर होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

