आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यात महिला अत्याचाराचे धिंडवळे निघत निघत आहे. स्वारगेट बस स्टँडवर बस मध्ये तरुणीवर बलात्काराची संतापजनक घटना घटना ताजी असताना पुण्यात 19 वर्षीय तुरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर येत आहे. या घटनेमुळे खळबळ माजली आहे. त्यामुळे पुण्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पण सतत होत असलेल्या अशा घटनांमुळे महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं चित्र समोर येत आहे.
पुणे जिल्हातील शिरूर तालुक्यात शनिवारी दिनांक 1 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास दोन तरुणांनी एका 19 वर्षीय तरुणीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला. त्यानंतर हे नराधम आरोपी इतक्यावरच नाही थांबले त्यांनी पीडित तरुणीला आणि तिच्या चुलत भावाला आक्षेपार्ह स्थितीत येण्यास भाग पाडलं. त्यानंतर त्यांनी त्यांचा व्हिडिओ देखील काढला.
पोलिसानं कडून मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांनी माहिती दिली की, पीडित तरुणी आणि तिच्या चुलत भाऊ हे सोबत घराजवळील निर्जन ठिकाणी बसले होते. याच दरम्यान दोन अज्ञात पुरुष दुचाकीवरून घटनास्थळी पोहचले. यावेळी या दोघांनी तरुणीला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. एवंढच नाही तर, व्हिडीओ देखील बनवला. शिवाय तरुणीकडे असलेली सोन्याची नथ आणि पेंडेंट घेऊन आरोपी फरार झाले.
पोलिसांनी नराधम आरोपींना ठोकल्या बेड्या: या घटनेच गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीची शोध सुरू केला. पोलिसांनी आरोपीची माहिती गोळा केली आणि अवघ्या दोन तासांत दोन्ही नराधम आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यावेळी या आरोपींकडे तरुणीकडून लुटलेले सोन्याचे दागिनेही पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.

