अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील संत गोमाजी वार्डात वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपीनाय माहितीच्या आधारे वर धाड टाकून घरातून तब्बल १,७५,५०० रुपये किमतीचा ०८ किलो ७७५ ग्रॅम गांजा जप्त केल्याची माहिती प्राप्त झाली.
स्थानीक गुन्हे शाखा वर्धा येथील पोलीस हिंगणघाट परीसरात अवैध धंदयांवर कारवाई करीता गोपनिय माहीती काढीत असता पोलीसांना खात्रीशीर माहीती मिळाली की, शहर परीसरात गांजा विक्री करणारा सराईत आरोपी शाहरूख सरदार खान पठाण याने मोठ्या प्रमाणात गांजा अंमली पदार्थ आणलेला असून त्याचा चुलत भाऊ जुबेर गुलजार खान पठाण, रा. संत गोमाजी वार्ड हिंगणघाट याचे घरी ठेवलेला आहे. अशा विश्वसनीय माहीती वरून जुबेर गुलजार खान पठाण, रा. संत गोमाजी वार्ड हिंगणघाट याचे घरी गांजा अंमली पदार्थाबाबत छापा घातला असता त्याचे घरझडतीत शाहरूख सरदारखान पठाण याने आणून ठेवलेल्या ट्रॅव्हलर ब्याग मध्ये भरून असलेला मनोव्यापारावर परीणाम करणारा गांजा अंमली पदार्थ निव्वळ वजन ०८ किलो ७७५ ग्रॅम एकुण १,७५,५००/- रू. चा मुद्देमाल अवैधरीत्या मिळून आल्याने आरोपी जुबेर गुलजार खाँन पठाण याचे कडून जप्त करण्यात आला.
आरोपी जुबेर गुलजार खाँन पठाण यास त्याचे घरझडतीतुन मिळालेल्या ‘गांजा’ हा अंमली पदार्थ त्याने कोणा कडून आणला? या बाबत चौकशी केली असता शाहरूख सरदार खान पठाण, रा. संत गोमाजी वार्ड हिंगणघाट हा गांजा विक्री करतो. त्यानेच दोन दिवसापुर्वी घरी गांजा भरून असलेली बॅग आणून ठेवलेली असून सध्या तो त्याचे घरी नाही असे सांगीतले. यावरून आरोपी नामे जुबेर गुलजार खान पठाण, वय ३५ वर्षे, रा. संत गोमाजी वार्ड हिंगणघाट, शाहरूख सरदार खान पठाण, रा. संत गोमाजी वार्ड हिंगणघाट यांचेविरूध्द पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे एन. डि. पि. एस. एक्ट चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.
हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन,अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे यांचे आदेशान्वये पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, अमोल लगड, पोलीस कर्मचारी हमीद शेख, राजेश तिवस्कर, गजानन लामसे, मंगेश आदे, दिपक साठे, मुकेश ढोके, अखिल इंगळे, रितेश गेटमे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यानी केली.

