पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- दरवर्षीप्रमाणे यावर्षी सोमवार दि.17 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची (तिथीनुसार) जयंती व भव्य जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भव्यस्वरूपात साजरा करण्यात आला. शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य जन्मोत्सव सोहळा निमित्ताने निशुल्क रोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात गरजूंना औषधी व भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
नवीन बहुउद्देशीय सामाजिक व शैक्षणिक संस्था व वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, पुर्व विदर्भ कार्यालय धंतोली नागपूर येथे, शहर, गाव व जिल्यातील शिवभक्त व जनतेने या शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवात उत्स्फूर्त भाग घेतला. यावेळी भव्य निशुल्क रोगनिदान शिबिराचे आयोजन सकाळी १०.०० वाजता सुरु करण्यात आले. या निशुल्क रोगनिदान शिबिरादारम्यान दिव्यांग, विकलांग व अपंग मुलांना व्हीलचेयर वाटप करण्यात आले. यावेळी जनतेनी निशुल्क आरोग्य रोगनिदान शिबिराला भेट देऊन लाभ घेतला व हेल्थ चेकअप, बीपी, शुगर चेकअप व क्रीम्स हॉस्पिटल रामदास पेठ व मेडिकल हॉस्पिटल तर्फे सर्व डॉक्टर व त्यांच्या टीमने पिढीत लोकांचे हेल्थ चेकअप केले,
यावेळी डॉ.प्रिया गुप्ता आयडियल मल्टिस्पेशालिटी डेंटल क्लिनिक तर्फे मोफत दंत चेकअप करण्यात आले. वैद्यकीय मदत कक्षाचे पुर्व विदर्भ प्रमुख प्रवीन लता बालमुकुंद शर्मा यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभिषेक व पूजा अर्चनासाठी अतिथीच्या हस्ते एसीपी सुधीर नंदनवार तसेच धंतोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनामिका मिर्जापुरे यांनी शिवछत्रपती शिवाजी राजेच्या प्रतिमेला हार अर्पण करून महाराजांना मानवंदना देऊन पूजा अर्चना व अभिषेक करून निशुल्क रोगनिदान शिबिराची सुरुवात केली. यावेळी वैद्यकीय मदत कक्षाचे सर्व पदाधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित होते.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे निशुल्क रोगनिदान शिबीर सायंकाळी ६ वाजेपर्यंत होता व भव्य महाप्रसाद कार्यक्रमांची सुरुवात दुपारी ३.०० वाजतापासून झाली. यशस्वीरित्या या कार्यक्रमात उद्घाटक आणि प्रमुख उपस्थिती मध्ये मेडिकल हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्या हस्ते दिव्यांग यांना सायकल वितरण व नागपूर शहराचे पीसीआर विभाग डीवायएसपी डॉ. अशोक बागुल यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना लागणारे साहित्य वितरण व नागपूर सेंट्रल जेलचे अधीक्षक वामनराव निमजे व नागपूर शिक्षण विभाग अधिकारी अशोक डोये, शब्बीर सवारे, विजय चौळे यांच्या हस्ते महाप्रसादाची सुरुवात व शिवछत्रपती शिवाजी महाराजांची पूजा अर्चना लोकमत प्रेस कडून वरिष्ठ क्राईम रिपोर्टर नरेश डोंगरे व अँड. सचिन गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आली.
या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे यांच्या OSD आणि वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक मंगेश चिवटे व वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र प्रमुख रामहरी राऊत सेवा देणारे सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय मदत कक्षाची टीम यांना व्हिडिओ कॉल कॉन्फरन्स द्वारे शुभेच्छा दिली तसेच या कार्यक्रमाला सफल बनवण्याकरिता नागपूर शहर व जिल्हा वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी नेहा अंबादे, उषा धुर्वे, शिल्पा रामेलवार, राहुल हेडाऊ, फयाज खान, करुणा हेडाऊ, ज्योती शर्मा, जुही शर्मा, अरविंद ठाकूर, राजेंद्र बोबडे, माला आंबुलकर, राजेंद्र तिवारी, रजत चव्हाण, चंद्रकला ठाकरे, दुर्गा कोसारे, शशीकला चौधरी, रेणू सिंग ठाकूर, उज्वला कांबळे, भावना कोये, अनिता देशमुख, अभिजीत मानकर, अर्णव अंबादे, आर्यन शर्मा, मयूर रामटेके, करण सिंग, डॉ. सूर्यकांत दिवेदी, नीलकंठ साहू, राकेश साहू, अशोक लोखंडे, यशवंत डहाके, जगदीश गुप्ता, सूर्यकांत दुबे, वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख विनोद बाबुळकर, जिल्हा प्रमुख डॉ. प्रमोद कडू, चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख अरविंद धिमान, जिल्हा प्रमुख दीपक कामतवार, माणिक हिंगरे, उपजिल्हा प्रमुख गोपाल पोचमपल्लीवार, बालाजी सातपुते आदी वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

