श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील व महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असलेले प्रतिष्ठान नगर अर्थातच श्रीक्षेत्र पैठण या ठिकाणी प्रतिवर्षी नियमा प्रमाणे याही वर्षी अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये सर्व भाविक भक्त आपली आपली वारी संपन्न करण्यासाठी महाराष्ट्रसह विदर्भ मधून शेकडो लोक श्रीक्षेत्र पैठण येथे दाखल होत आहेत आज श्री क्षेत्र पैठण येथे श्री संत शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांची षष्ठी अर्थातच जल समाधी सोहळा मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदाच्या वातावरणामध्ये लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे तरी काही दिंड्या लांबच्या असणाऱ्या तुकाराम बीज पासून तसेच काही दिंड्या जवळच्या असलेल्या चतुर्थी पासूनच निघालेल्या महाराष्ट्र सह विदर्भातून दिंड्या निघालेल्या आज श्रीक्षेत्र पैठण येथे दाखल झालेल्या असून सध्या श्रीक्षेत्र पैठण येथे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर आज श्री विजय पांडुरंग यांचे दर्शन घेण्यासाठी श्रीक्षेत्र पैठण येथील नाथ महाराजांच्या नाथ वाड्यातील मध्यवर्ती नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये श्री विजय पांडुरंगाचे व सर्व स्थापित असलेल्या श्रीनाथ वाड्यातील देवतेचे दर्शन घेण्यासाठी लागलेल्या भाविक भक्तांच्या रांगा आज म्हणजेच दिनांक 20 तीन 2025 गुरुवारी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर सर्व भाविक भक्त पावन असं श्री गंगास्नान करणार आहेत आणि श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या श्री जलसमाधी चे दर्शन घेणार आहेत या ठिकाणी छत्रपती संभाजी नगर तेथील पोलीस अधीक्षक यांनी कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
कुठल्याही भाविकांना दर्शन घेताना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता सातत्याने येथे आपले प्रशासकीय कर्तव्य बजावणारे पोलीस बांधव कर्मचारी महिला पोलीस कर्मचारी हे घेत आहेत तरी सर्वांना श्री संस्थान श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे की सर्व भाविक भक्तांनी रांगेमध्ये उभा राहून श्री संत श्री शांती एकनाथ महाराजांचे दर्शन घ्यावे आणि आपली वारी सफल करावी असे संस्थांच्या वतीने सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आले आहे कुठे ही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता देखील श्री संस्थान पोलीस बांधवांच्या माध्यमातून तसेच अनिरुद्ध बापू यांच्या सेवेकरी यांच्या माध्यमातून घेत आहे.

