चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेसच्या कामाचा घेतला आढावा: पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधून जाणून घेणार सर्वांची मते.
संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने नेत्रदीपक कामगिरी करून १३ खासदार निवडून आनले मात्र विधानसभा निवडणुकीत पाहिजे त्या प्रमाणात यश मिळाले नाही. फक्त १६ आमदार निवडून आले. विधानसभा निवडणुकीत नेमक्या काय चुका झाल्यात यावर विचारमंथन करून भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुर्ण ताकदीने लढवायच्या आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी खचून न जाता जोमाने कामाला लागावे येणारा काळ हा काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा असणार आहे. सर्वांनी लक्षात घ्यावे व्यक्ती मोठा नाही, पक्ष संघटना ही सर्वप्रथम आहे. काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सक्षम पदाधिकारी नेमून जनसामान्यांचे काम करण्याची गरज आहे. देशात आणि राज्यात आज अत्यंत निराशाजनक वातावरण आहे. जनतेचे प्रश्न मोठय़ा प्रमाणात उभे आहेत. जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसला संघर्ष करावा लागेल. रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, त्यातून कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि जिल्ह्यात, राज्यात, देशात काँग्रेस गतवैभव प्राप्त करेल असे प्रतिपादन चंद्रपूर काँग्रेसचे निरिक्षक, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आमदार अभिजित वंजारी यांनी हाँटेल सिद्धार्थ प्रिमीयर येथे चंद्रपूर जिल्हा काँग्रेस आणि चंद्रपूर शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित बैठकीत केले.
यावेळी चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेसने आपल्या कामाचा आढावा निरीक्षकांसमोर सादर केला. त्यानंतर ते चंद्रपूर शहर तसेच तालुका, शहर तसेच ग्रामीण पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधून सर्वांची मते जाणून आपला अहवाल प्रदेश काँग्रेसला सादर करणार आहेत.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूर काँग्रेसचे निरिक्षक आ. अभिजित वंजारी, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हा प्रभारी मुजीब पठाण, जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार देवराव भांडेकर, महिला जिल्हाध्यक्षा सुनंदा धोबे, शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, प्रदेश सचिव विनोद दत्तात्रय, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, राजेश अडुर, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष सफाक शेख, प्रवीण पडवेकर, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदाणी, अरुण धोटे, सुनीता लोढीया, सुनीता अग्रवाल, चंदाताई वैरागडे, नंदू नागरकर, अँड. विजय मोगरे, दिनेश चोखारे, उमाकांत धांडे, राजु रेड्डी, तालुकाध्यक्ष विजय गावंडे, अनिल नरुले, गोविंदा उपरे, नितीन गोहणे, रंजन लांडे, उत्तमराव पेचे, देविदास सातपुते, वासुदेव पाल, गुरूदास गुरूनुले, रमाकांत लोधे, खेमराज तिडके, प्रमोद चौधरी, मिलिंद भोयर, प्रशांत काळे, निर्मला कुडमेथे, सोनू दिवसे, यासह चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशन चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

