अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- गडकरी चौक सावनेर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती समाजसेवक सुभाष मछले यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली.
उपस्थित पाहुण्यांनी सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सर्वप्रथम बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त केक कापण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारावर मार्गदर्शन केले. सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. विविध प्रकारच्या झाक्याचा समावेश असलेली मिरवनुकिला आलूभात, मठ्ठा, बुंदीचे वितरण करण्यात आले.
यावेळी उपस्थितांमध्ये सुभाष मछले, योगेश सोनकर, गोपाल घटे, दिलावर शेख, रुपेश जामदार, सुधाकर टीबोले, सतीश मिश्रा, सोनबा ठाकरे, नरेश छत्रे, नरेश मछले, देवराव बन्सोड, महेंद्र पुसान, अनिल झरपरे, पवन जैस्वाल व योगेश पाटील होते.

