वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिर्थपुरी पोलीस स्टेशनवर दि 17 जून रोजी भव्य निदर्शने व अंदोलन.
रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन तिर्थपुरी:- तिर्थपुरी येथील पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले सहा. पोलीस निरिक्षक यांनी राजकीय पुढारी व धनदांडगे प्रस्थापीत मंडळीच्या सांगण्या वरून 10 भिम सैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले व 35 वर्षा पुर्वी निधन झालेल्या व्यक्तीला व नाबालक मुलाचे पण नावे टाकली, या सर्व घटनांची चौकशी व कार्यवाही करण्यात यावी परंतु चौकशी आणि कार्यवाही होत नसल्यामुळे दि. 17 जून रोज मंगळवार सकाळी 10.30 वाजता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते पोलीस स्टेशन समोर वंचित बहुजन आघाडी वतीने भव्य निदर्शने आयोजित केले आहे.
तरी या प्रकरणी पोलिस काय कारवाई करणार याची उत्सुकता आंबेडकरी समाजाला लागली आहे. पण भिम सैनिक व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्याने सामील व्हावे असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे तालुका सहसंघटक शंकर भालेकर यांनी केले आहे.

