Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे योगी नाहीत, सत्ताभोगी आहेत; गडचिरोलीत काँग्रेस पक्षा तर्फे शेतकरी न्याय पदयात्रा, मशाल मोर्चा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
June 12, 2025
in आंदोलन, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, विदर्भ
0 0
0
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे योगी नाहीत, सत्ताभोगी आहेत; गडचिरोलीत काँग्रेस पक्षा तर्फे शेतकरी न्याय पदयात्रा, मशाल मोर्चा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- नरेंद्र मोदी हे मागील 11 वर्षांपासून पंतप्रधानपदावर विराजमान आहेत, पण त्यांनी 11 वर्षात जनतेला दिलेल्या आश्वासनांतील एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मोदी व फडणवीस जे बोलतात ते कधीच करत नाहीत. स्वतःला फकीर म्हणवणारे नरेंद्र मोदी लाखो रुपये किंमतीचे जॅकेट्स, लाखो रुपयांचे कपडे वापरतात, महागड्या वस्तू वापरतात, ते योगी नाही तर सत्ताभोगी असून जनतेला दिलेली वचने पूर्ण न करणारे अधर्मी आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीतील मतचोरीची चौकशी करावी यासाठी काँग्रेस पक्षाने आज (दिनांक 12 जून) पासून राज्यभर मशाल मोर्चे काढण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार गडचिरोलीत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात मशाल मोर्चा व शेतकरी न्याय पदयात्रा काढण्यात आली.

यावेळी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेव किरसान, खासदार प्रतिभा धानोरकर, AICC चे सचिव व सहप्रभारी कुणाल चौधरी, माजी मंत्री अनिस अहमद, आमदार अभिजित वंजारी, माजी आमदार सुभाष धोटे, गडचिरोली काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, आपण सतत गडचिरोलीचा दौरा करतो असा टेंभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिरवत असतात पण ते गडचिरोलीच्या विकासासाठी नाही तर सुरजागडच्या लोह खाणीतून मिळणाऱ्या मलईतून स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी येतात.

स्टिल सीटी करण्याच्या नावाखाली गडचिरोली येथील शेतकरी, आदिवासी, शेतमजूर, स्थानिकांवर सुरा फिरवत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना गडचिरोलाचे फडणवीसस्थान करायचे आहे. सुरजागडच्या खाणीला विरोध करू नये म्हणून हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून खाणीला विरोध करणार नाही, मोर्चात सहभागी होणार नाही असे लिहून घेतले जाते. विरोधात बातमी छापली तर कारवाई केली जाते.

मुंबई ही मराठी माणसाची, कष्टकरी, गिरणी कामगारांची होती पण आज मुंबईत मराठी माणूस दुर्बिण लावून शोधावा लागतो तीच परिस्थिती गडचिरोलीची होणार आहे. प्रदुषण वाढेल, आपल्या संस्कृतीला धोका पोहचेल आणि या खाणीमुळे स्थानिक लोक हद्दपार होऊन परराज्यातील लोकांचे वास्तव्य वाढेल अशी भिती त्यांनी व्यक्त केली.

काँग्रेस पक्षाचे नेते आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘तिघे भाऊ महाराष्ट्र लुटून खाऊ’, असे भाजप युती सरकारचे सुरू आहे. शेतकऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. कर्जमाफी देत नाहीत, कर्जमाफीसाठी पैसे नव्हते तर घोषणा का केल्या? शेतकऱ्यांशी बेईमानी करणाऱ्या महायुती सरकारला धडा शिकवावाच लागेल.

लाडक्या बहिणींचा विश्वासघात केला, 2100 रुपये देण्याची घोषणा केली पण आता 1500 रुपयेही मिळणे अवघड झाले आहे, 500 रुपये हातात टेकवत आहेत. सरकार कितीही सांगत असले तरी लाडकी बहिण योजना बंद करण्याचा त्यांचा डाव आहे. भाजप युती सरकारने शेतकरी लाडक्या बहिणींची फसवणूक केली आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

Tags: Congress workers partyGadchiroliNarendra modiPm Modi
Previous Post

महाराष्ट्र हादरला: सांगलीत 18 दिवसा अगोदर लग्न झालेल्या बायकोने कुऱ्हाडने डोक्यात वार करत केली पतीची हत्या.

Next Post

गडचिरोलीत काँग्रेसच्या शेतकरी मेळावा व न्याय पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गडचिरोलीत काँग्रेसच्या शेतकरी मेळावा व न्याय पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

गडचिरोलीत काँग्रेसच्या शेतकरी मेळावा व न्याय पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In