संतोष मेश्राम चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- संपूर्ण देशात अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. फिटनेस झुंबा व योगा क्लास मध्ये नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा गडचांदुर तर्फे योग शिक्षक विजय शेट्टी व शीला शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. गेल्या तिन वर्षांपासून त्यांनी योगा व झुंबा क्लास मध्ये कार्यरत आहेत. पर्यावरण आणि योगा यांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम तसेच जीवनातील महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल धोटे, कोरपना तालुका महिला संघटीका यांनी केले. प्रास्तावीक स्मिता विरुटकर यांनी तर आभारप्रदर्शन अरुणा सालवटकर, कोरपना तालुका महिला उपाध्यक्षा यांनी केले. यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या कोरपना तालुका महिला अध्यक्षा उषा टोंगे, सचिव विजया नामेवार, महीला संघटीका सुलभा कुरेकर, स्मिता विरुटकर व योगा क्लास च्या महीला उपस्थीत होत्या.

