मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रांतील पदाधिकाऱ्याची आढावा बैठक स्थानिक साई मंदिर सभागृह येथे पार पडली. या आढावा बैठकिला जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, माजी आमदार वसंत बोंडे, जिल्हा निरीक्षक सुरेश गुडधे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, नागपूर जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंठे सहकार नेते वासुदेव गौळकार, तालुका अध्यक्ष महेश झोटिंग, माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगणघाट विधानसभा पदाधिकारी आढावा बैठक पार पडली.
आगामी होणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणूका, जिल्हा परिषद निवडणूका, पंचायत समिती निवडणुका, ग्रामपंचायत निवडणूकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सज्ज रहावे असे आवाहन प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटक हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून सविस्तर मार्गदर्शन नवनियुक्त जिल्हा निरीक्षक सुरेश गुडधे पाटील यांनी केले.
आगामी होणाऱ्या निवडणूका समोर ठेऊन प्रत्येकाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धेर्य धोरणे, पक्षाचे कामे लोकांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. तसेच लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्येचे निराकरण करावे असे मनोगत जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत यांनी व्यक्त केले.
यावेळी मंचावर तालुका अध्यक्ष विनोद वानखेडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवें, दिव्यांग प्रदेश सचिव मारोती महाकाळकर, कृषी जिल्हाध्यक्ष प्रभाकर रेवतकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, युवक प्रदेश सचिव संदीप किटे, माजी उपाध्यक्ष सुधाकर खेडकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहराध्यक्ष बालू वानखेडे, अमोल बोरकर, समाजसेवक सुनील डोंगरे, माजी नगरसेवक अशोक पराते, माजी नगरसेवक बालाजी गहलोत, माजी नगरसेवक दिनेश देशकरी, सिंदी रेल्वे शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, युवक जिल्हाध्यक्ष प्रणय कदम, राजू भाईमारे, गणेश वैरागडे, सचिन पारसाडे आदी उपस्थित उपस्थित होते.

