युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका गिटार शिकवणाऱ्या शिक्षकाने पिस्तूलचा धाक दाखवून आणि आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकाच्या मुसक्या आवळल्या आहे. त्याच्या विरूध्द आर्म्स ॲक्टसह विविध कलमातंर्गत गुन्हा दाखल केला. सागर सिंग परोसिया वय 27 वर्ष रा. हिंगणा असे नराधम आरोपीचे नाव आहे.
आरोपी सागर परोसिया हा गिटार शिक्षक असून उज्ज्वल नगरात रॉकस्टार अकॅडमी चालवितो. दोन महिण्यापूर्वी तो त्याच फ्लॅटमध्ये राहायचा. तो 27 वर्षांचा असून एका 38 वर्षीय घटस्फोटीत महिलेशी लग्न केले. त्याच्या लग्नाला तीन वर्ष झाले. सध्या तो पत्नीसह भाड्याच्या खोलीत राहातो. पोलिसांनी त्याच्या घरून तलवार, चाकू आणि एक पिस्तूल जप्त केली आहे.
पीडित अल्पलयीन मुलगी बी.ए.च्या प्रथम वर्षाला शिकते. आरोपी पीडितेच्या कुटुंबीयांचा परिचित होता. पीडितेला गिटार शिकायचे असल्याने आई वडिलांनी मोठ्या विश्वासाने आरोपीकडे गिटार शिकायला पाठविले. दोनच महिने झाले होते. सुरूवातीचे आठ दिवस त्याने चांगल्या पध्दतीने गिटार शिकविले. दुसऱ्याच आठवड्यात त्याची वाईट नजर पीडितेवर गेली. त्याने पहिल्यांदाच एका कोपऱ्यात नेऊन न आवडणारा स्पर्श केला. ती घाबरली आणि सर्व सामान त्याच ठिकाणी ठेवून घरी निघून गेली.
23 जुलै रोजी सायंकाळी चार ते 6 वाजेदरम्यान सागरने पीडितेला फोन करून शिकवणी वर्गात बोलाविले. दहा मिनिटात आली नाही तर तुझ्या कुटुंबातील सदस्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. भयभीत झालेली पीडिता कोणालाच काही न सांगता शिकवणी वर्गात गेली. आरोपी आधीच तयारीत होता. त्याने पिस्तूलच्या धाक दाखवून बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर कधी पिस्तूल तर कधी चाकूच्या धाकावर वारंवार अत्याचार करायचा. पीडितेने विरोध केला असता आई वडिलांना ठार मारण्याची धमक देत होता.
जीवे मारण्याची धमकी बळजबरीने अत्याचार : आरोपी सागरने मंगळवार 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता पीडितेला फोन करून शिकवणी वर्गासाठी बोलाविले. त्यानंतर 6.30 वाजतेपर्यंत त्याने तिला घरी जावू दिले नाही. 4 ते 6.30 दरम्यान म्हणजे अडीच तास त्याने बळजबरीने अत्याचार केला. विरोध केला असता पिस्तूलने आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. भीती पोटी तिने कुणालाच काही सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 ऑगस्ट रोजी पुन्हा दुपारी 2 वाजता पीडितेला फोन करून बोलाविले. यावेळी मात्र, पीडितेच्या अंगाचा थरकाप उडाला. हिंमत करून आईला घटनेची माहिती दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

