युवराज मेश्राम प्रधान संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कन्हान:- येते नुकताच विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचा मेळावा व व दिंडी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खडीगंमत, भारुड, दंडार, कीर्तन, भजन, कव्वाली, नृत्य, गायन या सर्व कलाकारांनी मेळाव्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
उमंग कलाकार महोत्सव व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंटकचे नेते जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नरेश बर्वे हे होते तर कार्यक्रमाचे उदघाटक नगरपरिषदचे माजी अध्यक्ष जिल्हा परिषदचे माजी सदस्य शंकरराव सहांदे हे होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून वृद्ध कलावंत मानधन समितीचे सदस्य प्रकाशराव काळे गुरुजी व आनंदराव खडसे त्याचप्रमाणे वृद्ध कलावंत मानधन समिती जिल्हा भंडाऱ्याच्या सदस्य ज्योतीताई वाघाये या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मनीष भिवगडे व कार्यक्रमाचे विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे कार्याध्यक्ष अलंकारजी टेंभुर्णे हे होते.
सर्वप्रथम पाहुणे मंडळींनी छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहीर अण्णाभाऊ साठे व दिवंगत धर्मदाची भिवगडे यांना माल्यार्पण केले. यावेळी नगरपरिषदचे माजी अध्यक्ष शंकरराव चाहांदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र बर्वे व कार्यक्रमाचे उद्घाटक शंकरराव चांदे यांचा शाल स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे कलावंता करिता झटणारे नागपूर जिल्हा अध्यक्ष दयाल कांबळे भंडारा जिल्हा अध्यक्ष रामनाथ पारधीकर चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष शंकर रामटेके पत्रकार संजय खांडेकर पत्रकार युवराज मेश्राम जिल्हा महिला प्रतिनिधी माया गनोरकर, जिल्हा महिला प्रतिनिधी विद्या लंगडे, विदर्भाच्या नेत्या संगीता भक्ते, जिल्हा महिला प्रतिनिधी सोनाली गोंडाने, जिल्हा महिला प्रतिनिधी सुनंदा ठाकरे, जिल्हा महिला प्रतिनिधी चंद्रकला वाघमारे, काटोल तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर तायवाडे, नरखेड तालुकाध्यक्ष सुधाकर खजुरीये, हिंगणा तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम निघोट, कळमेश्वर तालुका कार्याध्यक्ष शंकर होले, उपाध्यक्ष शंकर श्रीखंडे, कुही, उमरेड, भिवापूर प्रमुख रामभाऊ धनजोडे यांचा सत्कार विदर्भ शाहीर कलाकार परिषदेतर्फे घेण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेशभाऊ बर्वे यांनी कलावंताच्या समस्या सोडविण्याकरता तत्पर असल्याचे सांगितले तर कार्यक्रमाचे उद्घाटक शंकररावजी चहांदे यांनी कलावंताच्या समस्या सोडविण्याकरता शासन दरबारी आवाज मी तुमच्यासोबत आहे असे सांगितले, संघटनेचे कार्याध्यक्ष अलंकारजी टेंभुर्णे यांनी वृद्ध कलावंत मानधन हे 40 वर्षापासून लागू करावे असे त्यांनी नमूद केले कारण खडी गंमत मधील डान्सर हा वयाच्या 18 व्या वर्षापासून नृत्य करीत असतो, परंतु तो जेव्हा पन्नास वर्षाचा होतो, तेव्हा तो थकलेला असतो. अगोदर शंभर वर्ष आयुष्य होते आता आयुष्य 65, 70 वर येऊन ठेपलेले आहे आणि म्हणून कलावंतांना त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी कलावंताला मानधन ते 40 वर्षापासून लागू करावे असे नमूद केले.
विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मनीष भिवगडे यांनी सर्व कलाकारांच्या समस्या जाणून घेतल्या. दिंडी यात्रा ही लोकांमध्ये आकर्षणाचे मुख्य कारण होते या कार्यक्रमाला नागपूर भंडारा, गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ तसेच मध्य प्रदेशातील कलावंतांनी हजेरी लावली होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वीते करता अलंकारजी टेंभुर्णे, मनीषजी भिवगडे, दयाल कांबळे, रामनाथ पारधीकर, शंकरराव रामटेके, युवराजजी मेश्राम, अरुण वाहने यांनी पथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे संचालन चेतना मागासवर्गीय बहु. संस्थेचे सचिव अरुण वाहने यांनी केले तर आभार प्रदर्शन केंद्रीय सदस्य मिलिंद खोब्रागडे यांनी केले.

