मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दरवर्षीप्रमाणे यंदाही नारायण सेवा मित्र परिवार व मायेची फुंकर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात समाजातील गरजू निराधारांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.
समाजातील जे वंचित घटक आहे, ते दिवाळीचा आनंदापासून वंचित राहू नये, म्हणून नारायण सेवा मित्र परिवाराच्या वतीने विविध समाजजोपयोगी उपक्रम राबविले जातात. या अंतर्गत गरजू निराधारांना दिवाळीनिमित्त कपड्याचे निःशुल्क वाटप करण्यात आले. तसेच जलाराम मंदिर परिसरात अशा कुटुंबियांना फराळ मिठाईचे वाटप करण्यात आले. लहान मुलांना चॉकलेट बिस्कीट चे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. सामाजिक संस्थांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित स्वास्थ निरीक्षक विजय खोब्रागडे, विजय गुप्ता ,लालचंद भुतडा, ज्योत्स्ना बावणे , अध्यक्ष मायेची फुंकर, दिपाली कांबळे व लक्ष्मी गुप्ता यांच्या हस्ते फराळ व मिठाईच्या किटचे वाटप करण्यात येऊन दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला नारायण सेवा मित्र परिवाराचे पदाधिकारी सदस्य व शहरातील गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती.

