वैशाली गायकवाड, उपसंपादक
पुणे :- दिवसेनदिवस शहरातील वाहतुकीची समस्या अधिक वाढत आहे. रस्ते अपुरे आणि वाहतूक जास्त अशी स्थिती दिसून येते आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून जाताना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
धानोरी, लोहगाव येथील पोरवाल रस्ता परिसरात मागील काही वर्षांपासून अनेक गृहप्रकल्प निर्माण झाले आहेत, वाढत्या लोकसंख्येमुळे स्थानिक नागरिकांना येण्या- जाण्यासाठी पोरवाल रस्ता हा एकमेव पर्याय आहे, या रस्त्याला पर्यायी रस्ता नसल्याने स्थानिक नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते होते.
सोसायटी मध्ये रोज जाणारे पाण्याचे टँकर, बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी जाणारे ट्रक, शाळेच्या बस, या सगळ्यामुळे पोरवाल रस्त्याच्या वाहतूकीची गंभीर समस्या निर्माण झाली होती.
पर्यायी रस्त्यांवर असलेल्या मार्थोपोलिस शाळेच्या परिसरातील जागा मिळत नसल्याने रस्त्याच्या कामात अडथळा निर्माण होत होता. त्यावर मार्ग काढण्यासाठी स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांनी पोरवाल रस्त्याला समांतर असा कलम २०५ अंतर्गत पर्यायी सुधारित रस्त्यांचा प्रस्ताव महानगर पालिकेला दिला होता, मात्र त्यावर कार्यवाही होत नसल्याने आमदार सुनील टिंगरे यांनी मार्च महिन्यात उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाने धानोरी स,न,१२,१४,१५,१७ मधून २४ मिटर रूदीचा रस्ता कलम २०५ अन्वये रस्ता आखण्याचा प्रस्ताव शहर सुधारणा व मूख्य सभेत तातडीने मंजूर करण्यात आला.
असे असूनही मार्थोपोलिस शाळेच्या परिसरातील जागा मिळत नसल्याने गत महिन्यात आमदार टिंगरे यांनी या शाळेचे पदाधिकारी व आयुक्त यांची एकत्रित बैठक घेऊन जागा हस्तांतरित करण्या बाबत चर्चा केली होती. त्या नुसार महापालिकेच्या बांधकाम विभागाने शाळेला पत्र पाठवले होते. त्यावर शाळेने रस्त्यासाठी आवश्यक असलेली जागा देण्यास बुधवारी मंजुरी दिली असल्याचे आमदार टिंगरे यांनी सांगितले. त्यामुळे रोजच्या होणा-या वाहतुकीच्या कोंडीतून नागरिकांची लवकरच सुटका होणार आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348