कवी: गिरीष जाधव राह. पुणे
असे विकलांग मनं, तरी सलते मनात वेदना.
घाव उराशी बांधुन, झोपाळा ही झुळतो.
वाटते आता रानभरं तुला शोधतं हिंडावे.
वारयाला ही मिटुनं तुला पुसावे.
प्रेंम तुझे चापे कळी
दरवळते मोगरयाच्या गर्द गर्द सुहाच्या बनी
तु असेसं तार छेडावी, स्वरात तो तुला भेटावा
मखमाली फुलपाखरू हिंडावे झाडा झुडापाच्या
पारंब्यातुन, तु राञं राञं जागावी, स्वरांच्या तारातं त्याला शोधावी, तो रागं
होत तुझ्या कंठात त्यांनी विसावा घ्यावा.
तो कोकीळं पक्षी झाडांच्या ढहाळीवरं
मधुर स्वरातं चिंब भिजावा
त्याच्या कंठाची सादं ऐकतं
ओला पाऊस ही धरणीवर बरसावा.

