✒️प्रशांत जगताप, संपादक
हिंगणघाट:- काँगेस नेते राहुल गांधी यांच्या नेृत्वाखालील संपूर्ण भारतभर भारत जोडो यात्रा काढण्यात येत आहे. सध्या ही यात्रा महाराष्ट्रात आली आहे. त्यात अनेक नेते, कार्यकर्ते आणि हजारो नागरिक सहभागी होत आहे. या पदयात्रेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पदयात्रेत सहभाग नोंदविला.
विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव येथे संत गजानन महाराजांची प्रतिमा राहुल गांधींना भेट देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अतुल वांदीले यांनी राहुल गांधी यांना विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या व अतिवृष्टीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी सांगितल्या.
कन्याकुमारी येथून निघालेली भारत जोडो यात्रा ही विदर्भात पोहचली असून काल शेगावात ही यात्रा आली. शेगाव येथे राहुल गांधीच्या सभेमध्ये लाखोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला होता. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार तथा माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा विद्या चव्हाण यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह माजी नगरसेवक प्रलय तेलंग, माजी सरपंच प्रशांत घवघवे, राकाँ. जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, जगदीश वांदिले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

