सतिश म्हस्के, जालना जिल्हा प्रतिनिधी 9765229010
जालना:- शहरातील निम्म्याहून अधिक पेट्रोल पंपांवर कंपनीने निश्चित केलेल्या सुविधा वाहनधारकांना पुरविल्या जात नाहीत. अनेक पंपांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, चाकांत हवा भरणे आदी व्यवस्था नाहीत. याशिवाय काही पंपांवर वाहने बेशिस्तपणे थांबत असल्याचा त्रास अन्य वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.
जालना शहर हे मोठे शहर असून पण शहरातील अनेक पेट्रोल पंपावर वाहनधारकांना पिण्यासाठी आणि हवा भरण्याची सुविधा उपलब्ध नाही. स्वच्छता गृहाची व्यवस्था नाही. काही पेट्रोल पंपावर हवा भरून देण्याचेही यंत्र गायब आहेत. शहरातील निम्म्या पेक्षाजास्त पेट्रोल पंपावर कंपनीने निश्चित केलेल्या सुविधा वाहनधारकांना देण्यात आलेल्या नाहीत.
जालना शहरातील पेट्रोल पंपावर सार्वजनिक स्वच्छता गृह,पिण्याचे स्वच्छ पाणी, गाड्यांच्या टायर मधे मोफत हवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी जालना शहरातील पेट्रोल पंप धारक देण्यासाठी सरकारने पंप धारक कटिबद्ध असताना ही जालना शहर त्याला अपवाद आहे, यामुळे जालना जिल्हाधिकारी यांनी चौकशी करुन सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी आँटो चालकासह नागरिकांनी जिल्हा अधिकारी यांना निवेदन मार्फत दिले आहे. निवेदनावर दिलीप कोसदल, वामन कदम, रिजवान शेख, सुभाष पायदाने आदीची नावे आहेत.

