जाफराबाद येथे आविसंची तालुकास्तरीय कार्यकर्ता मेळावा संपन्न.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
सिरोंचा:- आदिवासी विद्यार्थी संघटना सर्वसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे. जाफ्राबादसह परिसरातील गावांच्या विकासासाठी आविस कटिबद्ध आहे. म्हणून आगामी होऊ घातलेल्या जाफराबाद येथील ग्राम पंचायत निवडणूकित दलबदलुंना रस्ता दाखविण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघाचे कार्यकर्त्यांनी आविस पॅनलचे उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे ,असे आव्हान आविसंचे नेते तथा माजी आमंदार दिपक दादा आत्राम यांनी कार्यकर्त्यांना केले.
आगामी होऊ घातलेल्या जाफराबाद ग्राम पंचायतीच्या निवडणूका लक्षात घेता तालुक्यातील जाफराबाद येथे आदिवासी विद्यार्थी संघटना शाखा सिरोंचाच्या वतीने तालुका स्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
या मेळाव्याला विशेष अतिथी म्हणून आविस नेते व माजी जिप अध्यक्ष अजय कंकडालवार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आविसं तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, माजी सभापती जयसुधा जनगाम, जि.प माजी सदस्य संजय चारडुके, नपं उपाध्यक्ष बबलू पाशा, नपं बांधकाम सभापती नरेश अलोने, आविसं जेष्ठ नेते शंकर मंदा, बाजार समिती संचालक मल्लिकार्जुन आकुला,अजय आत्राम, सूरज गावडे, लक्ष्मण गावडे, रजिता सडमेक, सरिता गावडे, आविसचे कोंडय्या कटकू, उपसरपंच उमेश मोहूर्ले, तिरुपती वाईल, विजय रेपालवार, वाय. कुळमेथे, तिरुपती दुर्गम आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.यावेळी आविस नेते व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कांकडालवार उपस्थित कार्यकर्त्यांना बहुमूल्य मार्गदर्शन करतांना विकासकामांसाठी जिल्हा परिषदेकडून जाफराबाद ग्रामपंचायतला आपण भरीव निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.
प्रास्ताविकेतून कुलमेथे यांनी जाफराबाद गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आविसं कटिबद्ध असल्याचे सांगितले. याप्रसंगी माजी जिप सदस्या जयसुधा जनगाम यांनी माजी आ. दिपक आत्राम व माजी जिप अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात जाफराबाद ग्रापं हद्दीतील गावांच्या विकासासाठी शासनाकडून कोट्यावधीची निधी खेचून आणित अनेक विकास कामे केल्याचे जनसमूदायाला सांगितले.
या कार्यकर्त्या मेळाव्याला सिरोंचाचे नपं स्वीकृत नगरसेवक राजेश बंदेला, प्रशांत गोडशेलवार, आविस शहराध्यक्ष रवी सुलतान, माजी सरपंच विजय कुसनाके, अविस सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिटयाला, जुनेद शेख, साई मंदा, गणेश रच्चावार, संदीप बडगे, सुधाकर कोरेत, सतीश पोरतेट, नारायण मुडीमाडीगेला, इरपा मडावी, नागेश दुग्याला, निर्मला कुळमेथे, उपसरपंच मंजुळा दिकोंडा, ग्राप सदस्य पेंटी तलंडी, मारोती चिटयाला,संपत गोगुला आदींसह ग्रापं जाफराबाद हद्दीतील टेकाडा, जाफराबाद, मोक्याला, नेमडासह सिरोंचा तालुक्यातील आविसं पदाधिकारी वनागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.