नितेश पत्रकार, झरि तालुका प्रतिनिधी
7620029220
यवतमाळ:- आज राज्यात मोठ्या प्रमाणावर महिला आणि मुलीवर अत्याचाराच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे आज असे प्रकार रोखण्यासाठी उपयोजना करण्याची गरज आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्हातील झरि जामणी, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा जूनोनी येथे 1098 हेल्प नंबर या बद्दलची माहिती देण्यात आली त्या वेळेस समुपदेशक पुनम मानकर, पुजा एकलवार यांनी मार्गदर्शन केले .
या वेळी आपल्या मार्गदर्शनात बोलताना चाईल्डलाईन 1098 भारतामध्ये लाखो मुलांची/मुलींची उम्मेदेची किरण आहे. लहान मुलांसाठी देखरेख व सहायतासाठी आपत्कालीन सेवा असून वर्षाचे 365 दिवस तथा 24 तास निःशुल्क सेवा आहे.
ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट अंतर्गत चालणाऱ्या चाईल्ड लाईन 1098 हा प्रकल्प चालत असून या माध्यमातून शासकीय माध्यमिक आश्रम शाळा जूनोनी येथिल बालकांना चाईल्ड लाईन 1098 ही 0 ते 18 वयोगटातील काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांकरिता असलेला टोल फ्री क्रमांक बद्दल बालकांना माहिती देऊन सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श कशाला म्हणावे? तसेच चुकीचा /वाईट स्पर्श जाणवल्यास आपण कसा विरोध करावा आणि कुठे सावधानी बाळगावी यावर मार्गदर्शन करण्यात आले.
या मद्ये सर्व वयोगटातील मुलामुलींनी 1098या बद्दलची पूर्ण माहिती ऐकून घेतली , त्यामध्ये चाईल्ड लाईन 1098 चे समुपदेशक पुनम मानकर आणि टीम मेंबर पूजा एकलवार यांनी मार्गदर्शक केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण खंडालकर , बोढे सर, पालकोंडावार सर, बेबीनंदा वरखडे तथा शासकीय माध्यमिक आश्रम शाळाचे शिक्षक तथा कर्मचारी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348