कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कमवा व शिका योजनेतून घेतला आदर्श
✒️प्रशांत जगताप, संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन हिंगणघाट:- स्थानिक विवेकानंद प्रशासकीय सेवा महाविद्यालय व जय जवान अकॅडमीचे भव्य क्रीडासंकुल, हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2022 चे औचित्य साधून केंद्र सरकारच्या कौश्यल्य विकास व उद्यम भारत अभियानाच्या धर्तीवर व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वावलंबी शिक्षण प्रणाली अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलेल्या “कमवा आणि शिका” या संस्कारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत विवेकानंद प्रशासकीय सेवा महाविद्यालया च्या प्रथम, द्वितीय, व तृतीय वर्षाच्या विदयार्थ्यांनी त्यांच्या स्व-जाणीवेतून आणि संकल्पनेतून विवेकानंद उद्यमि स्वयंरोजगार केंद्राचे आज उदघाटन करण्यात आले. सदर उद्यमि केंद्रातर्गत आज पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खाद्य पदार्थ्यांचे स्टॉल लावले, ज्या अंतर्गत, विशेषतः कच्चा चिवडा, फ्रुट सलाद, केळी,चहा-बिस्कीट, लिंबू-पाणी, ताक, लस्सी, ढोकळे, आलू पिंगर इत्यादी खमंग पदार्थांनी त्यांचे स्टॉल सजवले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी यावर ताव मारला.
तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने बाहेर गावून येणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय व्हावी, या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या या विवेकानंद उद्यमि कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन विवेकानंद प्रशासकीय सेवा महाविद्यालय हिंगणघाटचे प्राचार्य प्रा. योगेश वानखेडे व महाविद्यालयाच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. समीक्षा राऊत वानखेडे व जय जवान अकॅडमीचे संचालक सतीश तिमांडे यांच्या उपस्थित पार पडले. यादरम्यान सर्व विद्यार्थी व महाविद्यालया तील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348