ईसा तडवी, पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 98608846
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोरा,दि 15:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पाचोरा शहरातील महावितरणच्या एका कर्मचाऱ्याला ग्राहकाच्या गैर कृत्याचा सामना करावा लागला, या कर्मचाऱ्याला ग्राहकांकडून शिवीगाळ तर झालीच शिवाय मारहाणही करण्यात आली त्यामुळे ग्राहकावर थेट पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर घटना पाचोरा शहरातील मच्छी बाजार भागात कर्मचाऱ्यांशी एक ग्राहक भिडला होता, त्याच्याकडून सरकारी कामात अथळा निर्माण केला म्हणून परिणामी त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आला, ग्राहकांनी थेट वीज बिल थकले म्हणून कनेक्शन का कापले अशी विचारणा करत शिवीगाळ केली आणि थेट मारहाण करण्यास सुरवात केली. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी पाचोरा तालुका जळगाव येथे वरिष्ठ तंत्रज्ञ वायरमन प्रवीण सुभाष वंजारी हे पाचोरा शहरातील बाहेर पुरा, मच्छी बाजार, कृष्णापुरी त्रंबक नगर ,जळगाव रोडवरील भागातील डीटीसी 8168 560 ग्राहकांची विद्युत वितरण लाईनचे मेंटनस, ब्रेक डाऊन, विद्युत वितरण बाबत तक्रारीचे निराकरण करणे, असे कामकाज कर्मचार्याकडे होते.
हे कर्मचारी बाहेर पुरा भागातील मच्छी बाजार परिसरात थकबाकी व वसुलीचे व मीटर कट करण्याचे कामकाज करीत असताना, आरोपी गुलाब खान अहमद खान राहणार मच्छीबाजार बाहेरपुरा पाचोरा भागातील, ग्राहक क्र 122515947505 असा असलेला ग्राहक याच्याकडे सुमारे दोन महिन्याचे लाईट बिल थकीत असल्याने ते मीटर कनेक्शन खंडित करण्याचे आदेश प्राप्त झाले होते, त्यामुळे सदर मीटर कनेक्शन खंडित केले असता, तेथे हजर असलेले गुलाब खान अहमद खान यांचा मुलगा वसीम खान गुलाब खान याने आमच्या घराची लाईटचा कट केली, असे बोलून शिवीगाळ करून महावितरण वरिष्ठ तंत्रज्ञ वायरमन प्रवीण सुभाष वंजारी याला मारहाण करत धमकी दिली की तू परत या भागात थकबाकी वसुली करून दाखव, तुझे हातपाय तोडून तुझं मूर्द पाडून टाकेल अशी धमकी दिली , असे फिर्यादी मारहान करणाऱ्या विरोधात आज दिनांक 15 रोजी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून कलम 353 332 504 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशन कर्मचारी करीत आहे.
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

