सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- येथून एक दुर्दैवी अपघाताची घटना समोर आली आहे. बल्लारपूर- चंद्रपूर मार्गावरील रहदारीच्या ठिकाण असलेल्या रेल्वे स्टेशन चौकात एका ट्रकने रस्त्याने जात असलेली इसमाला चिरडले. यात त्या व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मोहम्मद फारूक अब्दुल गफ्फार वय ७० वर्षे रा. संत कबीर वार्ड, हिंगणघाट, असे मृतकाचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अपघातात मृत अब्दुल गफ्फार यांची मुलगी येथील टेकडी भागात राहते. ते हिंगणघाट वरून बल्लारपूर येथे मुलीच्या घरी आले होते. रविवारी रेल्वे चौकातून पायदळ रस्ता पार करीत असताना चंद्रपूरहून, आलापल्ली कडे जात असलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली. यात ते ट्रकखाली येऊन चिरडले गेले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रकचालक ट्रक तिथेच सोडून पसार झाला. पोलिसांनी तो ट्रक पोलिस स्टेशनसमोर नेऊन उभा केला आहे. पोलिस निरीक्षक उमेश पाटील घटनास्थळी लगेच दाखल झाले आणि पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवला.