नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवी मुंबई:- महावितरणने वीजचोरीच्या विरोधात धडक मोहीम उघडली आहे. याअंतर्गत मागील दहा महिन्यात वीजचोरीच्या एक हजार प्रकरणांचा छडा लावण्यास महावितरणच्या विशेष पथकाला यश आले आहे. उघडकीस आलेल्या या प्रकरणात चार कोटी ५७ लाख रुपयांची विजेची चोरी झाल्याचे उघड झाले आहे.
वीज महावितरणची थकबाकी वाढत असल्याने महावितरणने थकबाकी वसुलीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्याचप्रमाणे वीजचोरीला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार १ एप्रिल २०२२ ते १५ जानेवारी २०२३ या दहा महिन्यांच्या कालावधीत वीज महावितरणच्या भांडूप परिमंडळात वीजचोरीच्या विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. यातून संपूर्ण भांडूप परिमंडळ क्षेत्रात वीजचोरीची ५६७० प्रकरणे उघडकीस आली आहेत. याअंतर्गत १८ कोटी ४८ लाख रुपयांची वीजचोरी आहे. वाशी परिमंडळातील एक हजार प्रकरणे असून, चार कोटी ५७ लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचे उघड झाले आहे. महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवली.