✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी .9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.1 : अनुसुचित जाती, इतर मागासवर्ग, विमुक्त भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या योजनेचे नवीन व नुतणीकरणाचे अर्ज भरण्याकरीता महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. परंतु अपेक्षित अर्जाच्या नोंदणी झालेल्या अर्जापैकी बरेच अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी प्रलंबित असलेले शिष्यवृत्तीचे अर्ज तात्काळ सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.
सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासुन महाडीबीटी पोर्टलवर भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी, राजर्षी शाहु महाराज मॅट्रीकोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसाईक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजना ऑनलाईन राबविल्या जात आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता योजनेचे नवीन व नुतणीकरणाचे अर्ज भरण्याकरीता दि.22 सप्टेंबर पासुन महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. या पोर्टलवर अनुसुचित जाती प्रवर्गातील अपेक्षित 10 हजार अर्जापैकी 7 हजार 492 अर्ज भरण्यात आलेले आहे. तसेच इमाव, विजाभज व विमाप्र या प्रवर्गाचे अपेक्षित 32 हजार अर्जापैकी 23 हजार 285 अर्जाची नोंदणी झालेली आहे. परंतु महाविद्यालय स्तरावर अनुसुचित जातीचे 2 हजार 764 तर इमावचे 9 हजार 938 इतके अर्ज प्रलंबित आहे.
महाविद्यालयाने प्रलंबित असलेले अर्ज कार्यालय स्तरावर पाठविण्याची खबरदरी घ्यावी व विद्यार्थ्यांचे समान संधी केंद्रामार्फत शिष्यवृत्तीचे अर्ज भरुन घ्यावे. शिष्यवृत्तीचे शंभर टक्के अर्ज भरल्या जातील याची दक्षता घ्यावी, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे.

