नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- येथील हाणामारीसह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला एका गुन्हेगाराला पोलिसांनी तडीपार करण्याचा आदेश काढला होता. पण हा सराईत गुन्हेगार हा तडीपार असताना तो ठाणे परिसरात अवैधरीत्या फिरत होता. सचिन गोळे हे या तडीपार व्यक्तीच नाव आहे.
सचिन गोळे हा एक वर्षासाठी तडीपार केलेला गुंड त्याच परिसरात पुन्हा आढळल्याने त्याला अटक केल्याची माहिती कोपरी पोलिसांनी रविवारी दिली. कोपरीतील आनंदनगर भागात राहणाऱ्या गोळे याला परिमंडळ पाचचे तत्कालीन पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी ठाणे जिल्ह्यासह मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतून एक वर्षासाठी हद्दपार केले होते. या मनाई आदेशाचा भंग करून गोळे पुन्हा वागळे इस्टेट परिसरात फिरत होता.