नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज वर्धा येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी आश्रमातील बापू कुटीला भेट देऊन तिथे महात्मा गांधी यांच्या जतन करून ठेवलेल्या वस्तूंची माहिती जाणून घेतली तसेच बापूंच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. या आश्रमाचा विस्तार आणि विकास व्हावा यासाठी संस्थेला सर्वतोपरी मदत करण्यास शासन तयार असल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले. यासमयी सेवाग्राम आश्रमातील प्रार्थना सभेत सहभागी होऊन नोंदवहीत अभिप्राय देखील नोंदविला.
याप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार डॉ.पंकज भोयर, भंडाराचे आमदार नरेंद्र बोंडेकर, नागपूर विभागाचे विशेष पोलिस महानिरिक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलिस अधिक्षक नूरुल हसन, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आशा बोथरा सर्वसेवा संघाचे अध्यक्ष चंदनपाल, टी.आर.एस. प्रभू, सेवाग्रामच्या सरपंच सुजाता ताकसांडे उपस्थित होते.