श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- धारूर तालुका हिंगणी बु. ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या कांदेवाडी गावात हर घर जल योजनेत मोठा भ्रष्टाचार उघड, यात वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असल्याचा अंदाज, जिल्हा परिषद अंतर्गत जलजीवन कामात मोठ मोठे नव – नवीन घोटाळे उघड होतं आहेत त्यापैकी हा एक, हिंगणी बु. ग्रामपंचायत मध्ये महिला सरपंच असतांना हा सर्वं कारभार त्यांचे पती जे की सरकारी कर्मचारी आहेत ते हे काम पाहतात, प्रत्येक कामात ते हस्तक्षेप करतात, जलजीवन मध्ये इस्टीमेट मध्ये पण त्यांनी स्वतःहा त्यांच्या उल्लेख केलेला आहे. केशव मनोहर खाडे पुरुष सरपंच असा, या वरून गाव पातळीवर उलट सुलट चर्चेला वाचा फुटली आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी अशी सर्वं गावकऱ्यांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे,
वारंवार तक्रार करूनही मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार यांनी अद्यापही दोषींवर कसल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही या वरून असे लक्षात येते की या दोषींना अधिकारी पाठीशी घालण्याचे काम तर करत नाहीत ना? असा प्रश्न जनतेतून उपस्थित होतं आहे, या बाबतीत लवकरात लवकर दोषींवर कारवाई व्हावी अन्यथा समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयुक्त कार्यालय समोर उपोषण करण्यात येईल. असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात येत आहे.